जगण्याचे कारणं ...
जगण्याचे कारण ...
MARATHI POETRY
Om Pimple
3/28/20261 min read
रडण्याचे कारण अनेक असतात
हसण्याचे एक शोधता यावं
आयुष्य फार छोटं आहे
मनभरून हसता यावं.
कमीपणा पण शोधता येतो
मोठेपणा दुसऱ्यांना देता यावं
स्तुति जरी नसेल जमत
तरी दुखावण्याच धाडस न व्हावं.
हिंसेच्या या अफाट गर्दीत
शांत मन ठेवता यावं
स्वभावाच जर शांत नसेल
तरी त्याची नक्कल करता यावं.
माणसं आहोत आपण
बुद्धीचा योग्य वापर जमावं
विशेष आहे जन्म हा
तरी त्याचं सोनं करता यावं.