एक कविता तुझ्यासाठी ...
एक कविता तुझ्यासाठी ...
MARATHI POETRY


एक कविता तुझ्यासाठी
तुझ्या आठवणीत रचलेली
तुझ्या अंतरंगात डोकावून
शब्द मनातून वेचलेली.
आठवण तुझी प्रत्येक ओळीत
लिहिताना तूच दिसलेली
कवितेची प्रत्येक ओळ
तुझ्यापासून सुचलेली.
प्रारंभ तर सोपाच होता
मात्र शेवट जरा जड वाटला
तुझ्या कवितेच्या प्रत्येक ओळीत
मला आपलेपणा वाटला.
दिवसाचे ही स्वप्न तू
मी तुलाच शोधत आहे
तुझ्या आठवणीत तुझ्यासाठी
तुझी कविता लिहीत आहे.