जगण्याची कला ...

कला जगण्याची ...

MARATHI POETRY

Om Pimple

4/8/20261 min read

happy birthday to you greeting card
happy birthday to you greeting card

कर आणखी थोडेसे
करण्यासाठी आहे फार
थांबून नको घालु
तू जीवन वाया आज.

संधी तर अनेक मिळतात
त्याचे सोने करायचे शिक
पोट भरण्यासाठी तर
भिकारीही मागतो भीक.

भिक मागून नाही तर
कष्टाने तू आयुष्य जिंक
तुझ्या भविष्याची वाणी
स्वतःच गायला शिक.

सर्वच गोष्टी मिळत नाही
त्या तर मिळवाव्या लागतात
इतरांना मागणे सोडून दे
त्या तर स्वतः कमवाव्या लागतात.