कविता म्हणजे ...

कविता...

MARATHI POETRY

Om Pimple

4/13/20261 min read

black and silver fountain pen
black and silver fountain pen

कविता म्हणजे
मनाची अबोल स्थिति
जी लेखनीद्वारे
बोलकी होते.

कवितेची प्रत्येक ओळ
मन निवडते
भावनेच्या दुनियेत
मला कविता घडवते.

राहीन जरी एकटा
तरी ती सोबत आहे
माझी लेखनी देह
अन् ती प्राण आहे.

मी स्मरण करतो ओवींचे
अभंग ही मनात आहे
मी कवितेचा होऊन जातो
कारण कविता एक साथ आहे.