कृष्ण कृष्ण ...

श्री कृष्ण यांचे वर्णन

MARATHI POETRY

Om Pimple

4/4/20261 min read

a statue of a religious figure
a statue of a religious figure

चंद्र माधूर्याने हसला
नभी प्रकाश दिसला
नक्षत्राच्या जोडीने
सखे कृष्ण जन्मला.

विश्व सहर्षाने खुलले
कृष्ण पाळण्यात बसले
राधिके समवेत
कृष्ण द्वारकेत खेळले.

बासरीच्या मधुर सुराने
अवघी सृष्टि सुखावली
कृष्ण भक्तीत रंगून
गंगामाई नाहून निघाली.