कृष्ण ...

भेटीस ये श्री कृष्णा...

MARATHI POETRY

Om Pimple

4/2/20261 min read

भेटीस ये कृष्णा
आता वृंदावन सोड
लागलीये मनाला
तुझ्या भेटीची रे ओढ.

आठवण तुझी
राधिके हून जास्त करतो
कृष्णाला मी माझ्या
ह्रदयाशी जपतो.

मान अभिमान
सर्व तुझ्या चरणापाशी
समोर उभा रहा
डोळे आहेत ते उपाशी.

इच्छा भेटण्याची
लळा लावते मनाला
कृष्ण जपतो मी
माझ्या अंतर्मनाला.