तू कृष्ण मी राधा ...

काव्य ...

MARATHI POETRY

Om Pimple

4/5/20261 min read

बहरुनी क्षणोक्षणी
मी फुलायचे विसरून जाते
बघताच क्षणी तुला
मी रडायचे विसरून जाते.

आठवताच तुला
शोध तुझा घेत राहते
झाड तू असतं
त्यावर कळी मी होते.

सुगंधी फूल तू
मी फुलपाखरू होते
संपूर्ण जीवन तू
मी तुझं जगणं होते.

तू मान असशील
तर मी कणा होते
तू कृष्ण सावळा
मी प्रेमळ राधा होते.