तुला शोधताना ...

मराठी काव्य

MARATHI POETRY

Om Pimple

4/9/20261 min read

silhouette photo of couple standing on beach watching sunset
silhouette photo of couple standing on beach watching sunset

तुला शोधताना
मीच हरवून गेलो
वर्णनाने तुझ्या
तुझे रूप साठवत गेलो.

प्रत्येक वाट नवी
तुझी चाहूल देत होती
चालताना पावलात
तुझी पाऊले उमटत होती.

मोगऱ्यासम सुवासिक
प्रत्येक आठवण तुझी
तुला शोधताना मनी
नवी पहाट होत होती.

तुझे ते हास्य पाहून
सौंदर्य पापण्यात आले
मिटताच क्षणी पापणी
पाण्याचे मोती झाले.