ही माय मराठी अमूची...
मराठी काव्य...
MARATHI POETRY
Om Pimple
3/3/20261 मिनिटे वाचा


मराठी आमुच्या मुखी शोभते
सदैव आमच्या ओठी नांदते
मराठी आमच्या मनामनात
घर करते ह्रदयात.
मराठी ही ओळख आहे
महाराष्ट्राची अस्मिता आहे
भाषेतील गोडवा
आणि मराठी संस्कार आहे.
अटळ असे भाग्य आहे
श्रेष्ठ असे आरोग्य आहे
मराठी हा मान आहे
संवदातील सन्मान आहे.
मराठी ही शक्ति आहे
निष्ठावान भक्ति आहे
जगातील आश्चर्य आहे
अन् मराठी शान आहे.

