ती...

ही कविता दर्शवते की, प्रत्येक स्त्री जी अनेक रूपाने आपल्या आयुष्याला घडवत असते आणि समृद्धता प्रधान करते.

MARATHI POETRY

Om Pimple

3/8/20261 min read

ती सुरुवात श्वासाची
अन् सोबती यशाची
ती जननी नाविण्याची
अन् महती ज्ञानाची.

ती जणू विश्व
अन् आनंद घरातील
ती एक ऊर्जा
अन् सकारात्मकता मनातील.

ती प्रथम गुरु
अन् सार्थी जीवनाची
ती ज्ञानस्त्रोत
अन् माऊली जगाची.

ती अतूट विश्वास
अन् मूर्ती त्यागाची
ती दुरदृष्टी
अन् शेवट प्रारंभाची.